जळगाव (प्रतिनिधी):- येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले.
याप्रसंगी डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. सौगदकुमार तायडे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. रूपाली चौधरी, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. साजीया खान, रजीस्ट्रार चेतन चौधरी, मोहीत येवले उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालय परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा महेश मछले याने साकारली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नाटिका सादर करण्यात आली. तसेच नृत्यदेखील सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौरभ मराठे, वेदांत चव्हाण, नेहल चौधरी यांनी केले. तर परिणीता पेठे व चेतना शिंदे यांनी नृत्य सादर केले. तर नाटीका आशिष तायडे, श्रृती उमाळे, रिध्दी जैस्वाल यांनी केले. सूत्रसंचालन कौस्तुभ वडगावकर, रांजली इंगळे यांनी केले.










