जळगाव — येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट आणि चरक शपथ ग्रहण समारंभ आज संपन्न झाला.पांढरा कोट समारंभ आयोजित करण्यामागचा उद्देश हा पांढरा कोट (एप्रन) सजवणे पदवीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षैत्रात सामील करून घेत पांढर्या कोटचे महत्त्व समजण्यास मदत करणे असा होता.
यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील,सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, शल्यचिकीत्सक डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ प्रशांत सोेळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले,डॉ. साजिया खान,डॉ. निखिल चौधरी, डॉ. कोमल खंडारे, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, डॉ. मयुरी चौधरी हे उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांना प्रेमाचे प्रतीक अर्पण करून, त्यानंतर सरस्वती वंदन व दिपप्रज्वलनाने झाली तसेच माजी खा. स्व.डॉ गुणवंतराव सरोदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू न अभिवादन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. अनिकेत पाटील यांनी जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्व विषद करत संस्कृत भाषेला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व आहे. व्हाईट कोट परिधान केल्यानंतर समाजासाठी नैतिक जबाबादारी आणि जबाबदारीची भावना बाळगणे हे कर्तव्य आहे असे पटवून सांगितले.डॉ. वैभव पाटील यांनी यशासाठी दृढनिश्चय ही गुरुकिल्ली आहे असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्यात. माजी खा डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात प्रवेशीत विदयार्थी व पालकांचे आभार मानत आपल्या पाल्यास सक्षम वैदय बनवणे ही आमची जबाबदारी असून आम्ही जागतिक स्तरावरील सुविधा उपलब्ध करून देवू पुढे बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करणे, त्यांना प्रेरणा देणे, जेणेकरून ते देशाचे जबाबदार नागरिक बनतील. त्यांच्यावर असलेली जबाबदारी केवळ त्यांच्या व्यवसायाचीच नाही तर त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि समाजाचीही आहे चांगले करा आणि चांगले व्यक्तीमत्व उठून दिसेल असे आमचे ध्येय आहे असे सांगितले. सोहम सचिन जोशी यांनी एक यशस्वी वैद्य तयार होतांना जी वागणूक आणि नियमाचे पालन शिकवणारी चरक प्रतिज्ञा सोहम सचिन जोशी यांनी संस्कृत मधून तर हिप्पोक्रेटीक प्रतिज्ञा विरेंद्र ताडे यांने इग्रजीतून दिली. यानंतर रूग्ण आणि वैद्य यांच्यातील संस्कृत संवादावर नाटीका सादर केली. डॉ. एन एस आर्विकर यांनी म्युझीक थेरेपीतून आरोग्या मिळणारे फायदे तसेच याबाबतचे संगीतातील राग व त्याचा आरोग्यसंबंधीत उपयोग विषद केला.डॉ प्रशांत सोळंके यांनी वैद्यकिय क्षैत्रातील तिनही थेरेपीचे आपआपले महत्व विषद करून संस्था हुशार विदयार्थी घडवण्यासाठी सर्वोतपरी तयार असल्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षा वानखेडे, रूतूजा हेलगे, अनुराधा शिंगोटे, धनश्री कुकडे यांनी तर आभार यसरा देशमुख, निर्सगा जाधव व सचिन सुराणा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी चेतन चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीत येवले, हेमंत जंजाळकर यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.