जळगाव ( प्रतिनिधी ) –– औडाक्स इंडिया आशियाई मार्फत नांदेड येथे आयोजित लांब पल्ल्याच्या ६०० किमी अंतराच्या जळगावच्या सायकलिस्ट क्लबच्या सदस्य व पॅथॉलॉजिस्ट डॉ अनघा चोपडे यांनी यशस्वी सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले
या स्पर्धेत ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासांचा कालावधी देण्यात आला होता. हे अंतर डॉ अनघा चोपडे यांनी 27 तास 46 मिनिट 9 सेकंदांमध्ये पुर्ण केले दरम्यान रात्री 2 तास झोपसुद्धा त्यांनी घेतली आणी दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू केला डॉ अनघा सुयोग चोपडे या स्पर्धेत सहभागी होऊन विजेत्या ठरलेल्या जळगाव जिल्यातील पहिल्याच महिला सायकलिस्ट आहेत
नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी 6.40 वाजता स्पर्धेची सुरुवात झाली, हैद्राबादच्या दिशेने सायकलिंगचा प्रवास सुरू झाला बिलोली येथील मेडिकल सुप्रितेडंट, मेडिकल ऑफिसर व गावकऱ्यांनी जल्लोषात या स्पर्धकांचे स्वागत केले मेडचल येथून परतीचा प्रवास सुरु झाला आणि नांदेड क्लब येथे फिनिशर्स पॉईंटवर हा प्रवास संपवाला. नांदेड सायकलिस्ट क्लबचे आयोजक आणी सदस्यांनी जल्लोषात या स्पर्धकांचे स्वागत केले
लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी डॉ अनघा चोपडे यांना जेवण आणी पेयांबाबतचे मार्गदर्शन डॉ सुयोग चोपडे यांनी केले डॉ अनघा चोपडे यांनी यापूर्वी २०० किमी अंतराच्या स्पर्धेत २ वेळा , ३०० किमी अंतराच्या आणि आता ६०० किमी अंतराच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.