चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पपूजा, धूपपूजा व द्विपपूजा करण्यात येऊन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी उपस्थित समाज बांधवांना त्रिशरण पंचशील, भीम स्मरण व भीम स्तुती दिले.
यानंतर “जगमे बुद्ध का नाम हैं यही भारत की शान हैं, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जबतक सूरज चांद रहेंगा बाबा तुम्हारा नाम रहेंगा ” आदी जोरदार घोषणा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, प्रदेश उपाध्यक्ष रा. कॉ. पार्टी पंकज वाघ,प्रदेश सचिव काँग्रेस राजू सवर्णे,सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे,वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, अधीक्षक भूमी अभिलेख राजू घेटे, कमलबाई गर्ल्स हायस्कुलचे उपमुख्याध्यापक रमण तायडे, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे, वंचित बहुजन आघाडीचे बाळू शिरतुरे, रावेर वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड. सुभाष धुंदले, ऍड. संदीप मेढे, संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. दिपक तायडे, सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे, पुंडलिकराव कोंघे, पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक प्रकाश महाले, बाळू तायडे, धनराज घेटे, अशोक अटकाळे, मगन भालेराव, अनिल घेटे, अनिल तायडे,किशोर तायडे,राहुल गाढे, सम्यक इंगळे यांचेसह शेकडो समाज बांधवांनी अभिवादन केले.