जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- सोफ्यावर झोपण्याच्या कारणावरून वाद झाल्याने तरुणाला दोन तरुणींनी मुसळी, काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील दूध फेडरशेनजवळ असलेल्या पॉवरहाऊसजवळ घनश्याम मानसिंग चंडाले हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोफयावर झोपण्याच्या कारणावरुन त्याचा रेश्मा धरमसिंग चंडाले व नितू दया चंडाले यांच्यासोबत वाद झाला. या वादातून दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर रेश्मा चंडाले हीने लोखंडी मुसळी तर नितू चंडाले हीने लाकडी काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, घनश्याम याने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष चिंचोले हे करीत आहे.