फैजपूर ता. यावल ( प्रतिनिधी ) – शहरात किरकोळ कारणावरून दोन गटात अश्लिल शिवीगाळ व हाणामारीत एकाला विषारी औषध पाजण्याच्या प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. फैजपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात दाखल तक्रारींवरून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून, यावल तालुक्यातील फैजपूर शहरात ३० वर्षीय महिला कुटुंबीयांसह राहते. त्याच भागात राहणारा शेख शकील शेख दगू हा जुन्या वादातून तरुणीला अश्लील शिवीगाळ करून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीला आली पीडित महिलाच्या फिर्यादीवरून शेख शकील शेख दगू यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लवंड करीत आहे.
दुसऱ्या शेख शकील शेख दगून याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित महिला ही अनोळखी तीन जण व एक मुलगा (पुर्ण नाव माहित नाही) यांनी ४ ऑक्टोबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्याच्या आवारात येवून शेख शकील याला शिवीगाळ केली इतर तिन जणांनी शेख शकीलच्या तोंडात विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला तोंडावर औषण फवारणी केली. पोलीसांच्या मदतीने माझी बदनामी करतो असे म्हणत खिशातील २० हजार रूपये काढून घेतले . शेख शकी शेख दगू यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.