यावल तालुक्यातील बामणोद येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – फैजपूर – भुसावळ रस्त्यावर बामणोदजवळ रईस हॉटेल समोर दोन दुचाकीची धडक होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना दि.२ मार्च सोमवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता घडली.या अपघातात विरोदा येथील श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले (वय ४६ वर्ष) यांचा मृत्यू झाला.


युवराज कपले हे बामणोद येथून कर्णछेदनाचा कार्यक्रम आपटून परतीच्या मार्गावर असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने यात युवराज कपले यांच्या डोक्याला जबर मार लागला व ते गंभीर झाले सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारार्थ भुसावल येथील गोल्डन अवर हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळावर असलेली अज्ञात व्यक्तीची दुचाकी (विना नंबर प्लेट एव्हेंजर लाल रंग ) अज्ञात व्यक्तीकडून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली असून भुसावळ येथून दवाखान्यातून येत असलेल्या गावकऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी असलेल्या अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी पुढील तपासासाठी फैजपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
होळीच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर कपले परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. सदर घटनेने विरोदा गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.








