पारोळा तालुक्यात करंजी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील करंजी येथील नाल्यात एका मेंढपाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात देवा बापू शिंदे यांनी खबर दिली.
बापू नामदेव शिंदे (वय ५५ वर्षे रा. निमडाळा, ता. जि.धुळे, ह.मु.करंजी ता. पारोळा) असे मयत इसमाचे नाव आहे. दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी कोणाला काही एक न सांगता निघून गेले होते. दरम्यान, वडिलांचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेत असताना दि. ४ ऑगस्ट रोजी करंजी गावाच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंताना दिसला. डॉ. प्रशांत रनाळे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर हे करीत आहेत.