जळगाव शहरातील भोईटे नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी तरूणीच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेल्याची घटना शहरातील भोईटे नगरात रविवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भोईटे नगरात राहणारी कल्याणी नंदू निकुंभ (वय २०) ही तरूणी रविवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजता दुध घेण्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ गेली होती. त्यावेळी अज्ञात दोन जण दुचाकीवर येवून त्यांच्या पर्समधील मोबाईल हिसकावून चोरून पसार झाल्याची घटना घडली. तरूणीने आरडाओरड केली परंतू अज्ञात चोरटे पसार झाले होते. दरम्यान तरूणीने रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नार्हक सुधीर साळवे हे करीत आहे.