जळगाव शहरातील दौलत नगर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – घरी कोणीही नसताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खुशी ही तरुणी आई, वडील व मोठ्या भावासह दौलतनगर भागात राहत होती. तिची आई मथुरा येथे गेलेली आहे. तर तिचे वडील मंदिरात व भाऊ बाहेर गेलेला होता. त्या वेळी घरी एकट्याच असलेल्या या तरुणीने गळफास घेतला. तिचा भाऊ घरी आला त्या वेळी हा प्रकार लक्षात आला. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









