पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील घटना
तालुक्यातील लोणी बु येथे भगवान वामन पाटील यांच्या शेतात विहीर खोदकाम सुरू होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साह्याने विहिरींमधील दगड बकेटच्या साह्याने बाहेर काढत असताना विहिरीत काम करणाऱ्या देविदास शिवाजी झेंडे (वय ३८, रा शिंदी पिंपळगाव ता. बदनापूर जि. जालना) यांच्या अंगावर दगड पडल्याने ते जागीच बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांना विहिरीतून बाहेर काढून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देविदास गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.