यावल ( प्रतिनिधी ) – येथील कैकाडीवाडा येथे काहीही कारण नसताना एकाने दोन जणांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाब खान अयास खान (वय-२२ , रा. काझीपुरा ) आणि शेख फरीद शेख शरीफ (वय-१४ , रा. राखिनीपुरा) हे दोघे १२ ऑक्टोबररोजी रात्री कैकाडीवाडा येथे फिरत होते. त्याठिकाणी दिलीप उर्फ बापू अशोक बारी (वय-४४ , रा. संभाजी पेठ) याने काहीही कारण नसताना लोखंडी रॉडने दोघांना मारहान केली. यात शहाब याला गंभीर दुखापत झाली.शहाब खान यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दिलीप बारीच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि ए.एस. पठाण करीत आहेत .