जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात डॉक्टर दिनानिमीत्त रिडींग रूमचे उदघाटन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रिडींग रूमचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी फित कापून उदघाटन केले तसेच विविध विभागातील प्राध्यापक डॉक्टरांचा सत्कार पुष्पगुच्छ देवून करण्यात आला तर विविध विभागात तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ चंद्रया कांते,डॉ.शिरीष, ज्योत्सना भिरूड,गोपाल भोळे,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड या मान्यवरांची उपस्थीती होती. संस्थापक अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन उपस्थीत राहून सर्व डॉक्टरांना शुभेच्छा व्यक्त करतांना रूग्णांप्रति आदरभाव राखत सेवा करावी असे आवाहन केले.