जळगाव ( प्रतिनिधी ) – खान्देशकन्या व महिला विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून महापरिनिर्वाणदिनी अभिवादन केले .
यावेळी भारतीय समाजातील महिलांचे स्थान व स्त्री – पुरुष समानतेसाठी डॉ आंबेडकरांनी दाखवलेला समतेचा मार्ग आजही समाजाला दिशादर्शक असल्याने महिलांनी बऱ्याच प्रमाणात स्वीकारलेली दुय्यम स्थानाची मानसिकता आता स्वीकारली पाहिजे त्यासाठी पुरुषांचे प्रगल्भ चिंताही समाजाला पाहिजे आहे , असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले .
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगला बारी, सचिव वंदना बारी, संगीता बारी, सदस्या सुषमा बारी, शारदा तायडे, रत्ना राजपूत, शरद माळी , राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.