शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिव्यांग दिन साजरा
जळगाव (प्रतिनिधी) :- दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करावे, त्यांच्या मर्यादांवर नाही. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेक अद्वितीय क्षमता आणि कौशल्ये असतात. त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या क्षमतांचा उपयोग करण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बोर्ड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग बोर्डामध्ये बुधवारी दिव्यांग दिननिमित्त हेलन केलर यांच्या प्रतिमेला दिव्यांग बांधवांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.
दिव्यांग बांधवांना सहानुभूतीपेक्षा सक्षम बनविण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे त्यांनी सांगितले यावेळी डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. पंकज डाबेराव, डॉ. मयुरी राठोड, डॉ. विनोद पवार, डॉ. भावना पाटील, डॉ. शताक्षी वाघजाळे, डॉ. सर्वेश काबरा, कर्मचारी चेतन निकम, आरती दुसाने, वैशाली महाजन, विशाल पाटील यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









