मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा नदीपात्रात पोलीस, महसूल विभागाचे दुर्लक्ष
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील थेरोळा परिसरात पूर्णा नदीपात्रात दररोज अवैध वाळू वाहतूक करणारे “पुष्पाराज” बोकाळले आहेत. त्यांच्याकडे पोलीस, महसूल विभागाने ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा केल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.
दिवसा वाळू जमा करून ठेवायची व रात्री अवजड वाहनांच्या माध्यमातून चोरटी वाळू वाहतूक करण्याचे काम केले जात आहे. याबाबत अनेकदा पोलिसांना सांगण्यात आले आहे. मात्र पोलीस, महसूल विभागाने पद्धतशीर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे.