जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील पाथरी रोडवर एका दुर्दैवी अपघातात वाघ नगर येथील ५४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वेगातील दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगावकडे जाताना अपघात
मृत महिलेचे नाव सरला भिका चौधरी (वय ५४, रा. वाघनगर, जळगाव) असे आहे. मृत महिलेचा मुलगा मिलिंद भिका चौधरी (वय ३४) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, सरला चौधरी यांचे पती भिका देवराम चौधरी हे त्यांना (क्र. MH-१९-EQ-३९१२) क्रमांकाच्या दुचाकीवर पाठीमागे बसवून जळगाव ते चाळीसगाव असा प्रवास करत होते.
डोक्याला गंभीर दुखापत
गुरूवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास, पाथरी गावाजवळील रोडवर दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली आणि त्यामुळे गाडीचा तोल गेला. या अपघातात सरला चौधरी रस्त्यावर खाली पडल्या.
त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताबाबत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राणांकित अपघाताचा (गुन्हा नोंद क्र. ३३०/२०१४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत.









