यावल तालुक्यात फैजपूर येथे घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यात फैजपूर येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय वहिनीवर घरात कोणी नसल्याची संधी साधून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून जळगावच्या तरुणावर फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
जळगावात गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला अटक झाली आहे. त्याचा मोठा भाऊ हा पत्नी, मुलगीसह फैजपूर येथे राहतो. संशयित आरोपी याने भावाच्या पत्नीवर दि. २० जून २०२४ रोजीपासून ते १७ मार्च २०२५ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले आहे.(केसीएन)दि. २० जून २०२४ रोजी दुपारी अंदाजे १२.३० वाजेच्या सुमारास वहिनीच्या घरी येवुन तिचे तोंड दाबुन बेडरुममध्ये जबरदस्तीने घेवुन गेला. जबरदस्तीने वहिनीवर लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर वेळोवेळी भाऊ व पुतणी म्हणजेच महिलेचे पती व मुलगी घरी नसतांना पुन्हा बळजबरीने फिर्यादी वहिनीचे संमतीवाचुन शारिरीक संबध केले आहे. त्यांनतर फिर्यादी वहिनीने त्याचेसोबत बोलणे पूर्ण बंद केल्याने संशयित आरोपी याने वहिनीसोबतचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करुन समाजात बदनामी केली, म्हणून वहीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे.