जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेलेल्या जळगावच्या भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन ग्रुपचे आज परतल्यावर जळगाव रेल्वेस्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले .
दिल्ली येथे राजपथवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं तसेच राष्ट्रपती, दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत .प्रजासत्ताक दिनानिमित्त वंदे भारतंम या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जळगावचा भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा ग्रुप सहभागी झाला होता. आज जळगाव रेल्वे स्टेशनवर परत आलेल्या या ग्रुपचे पुष्पहार घालून फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आले.