उमेदवार दिलीप खोडपे सरांना मतदार संघात ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
जामनेर (प्रतिनिधी ) जामनेर मतदार संघात ६ वेळा निवडून आलेले मंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो . मात्र या बालेकिल्ल्याचे त्यांचे एकेकाळचे मित्र असलेले दिलीप खोडपे सर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. दिलीप खोडपे सर यांना मतदार संघातून उत्स्फुर प्रतिसाद ग्रामस्थानमधून मिळत असल्याने सर्वत्र तुतारीमय वातावरण मिळत आहे. जामनेरच्या विकासाकरिता दिलीप खोडपे सर यांना निवडून देण्याचे वाहन मतदारांकडून करण्यात येत आहे.
शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. त्यामुळे देशाच्या ज्येष्ठ नेते समजले जाणारे शरद पवार यांच्या सभेला मतदारांनी केलेल्या गर्दीमुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला हादरा बसला आहे. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, आ. रोहित पवार यांच्या झंझावाती जाहीर सभा झाल्या .
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार आणि लोकप्रिय अभिनेते अमोल कोल्हे यांचा जामनेर शहर आणि पहूर, नेरी येथे रोड शो घेण्यात आला होता . या रोड शो ला जामनेर करांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिलीप खोडपे सरांची लोकप्रियता वाढली असल्याचे चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे. जामनेरकरांमध्ये जामनरे तालुका आणि मतदार संघाचा खुंटलेला विकास हा दिलीप खोडपे सर हेच करतील असा विषयास निर्माण झाला असून आता जामनेरकरांना परिवर्तन हवे असल्याने खोडपे सर विजयी होतील असा विश्वास नागरिक बोलू लागले असल्याने भाजपचा हा किल्ला ढासळेल असा मतप्रवाह नागरिकांमध्ये दिसून येत आहे.