जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पर्यवेक्षक दिलीप आसाराम पाटील हा लाखो रुपयांच्या पी एफ अफ़रातफरीसह अन्य घोटाळ्यांचा सूत्रधार असल्याचा आरोप करीत त्याच्या हकालपट्टीसाठी जवळपास ६५ सुरक्षा रक्षकांनी कुलगुरू , कुलसचिवांसह कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की , सुरक्षा सुपरवायझर दिलीप आसाराम पाटील एका एम सी मेंबरच्या वरदहस्ताने सुपरवायझर पदावर आला आहे . सर्वात आधी त्याने मानसिक त्रास देऊन 25 ते 35 वयातल्या सुरक्षारक्षकांना काम सोडण्यास भाग पाडले त्यांच्या जागी कमी शिकलेली व जास्त वयाची माणसे भरली . सुट्टीच्या दिवशी खोटी सही करून माणूस दाखवायचा व पगार झाला की त्याला पन्नास रुपये देऊन बाकी आपल्याकडे ठेवायचे हा त्याचा नेहमीचा उद्योग आहे ज्या सुरक्षारक्षकांना शिफ्ट चेंज करून पाहिजे त्यांच्याकडून भाजीपाला , मटन, पेट्रोल घेतो सुरक्षा रक्षकांकडून सर्रास महिन्याला पाचशे किंवा तीनशे रुपये घेतो
ज्या सुरक्षारक्षकाने ऐकले नाही त्याला मानसिक त्रास देणे डबल नाईट लावणे छोट्याछोट्या कारणावरून ड्युटी न देणे असे त्रास देतो चार वर्षाची हजेरीपत्रके तपासली तर त्याचे सगळे घोटाळे बाहेर येतील खोटी ड्युटी लावताना सुरक्षा अधिकारी शेखर बोरसे साहेबांनी त्याला रंगेहाथ पकडले मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही ठेकेदारांच्या पीएफ मधील 25 लाखांचा भ्रष्टाचार समोर आणणारे सुरक्षारक्षक मनोहर देवरे यांची लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदी असताना मलकापूरला बदली केली गेली होती भगवान पाटील यांच्याशीही त्याचा वाद होता ते ड्युटीला असताना झाडांची रोपे मोकाट गाईंनी खाल्ली अशी तक्रार कम्प्युटर सायन्स कर्मचारी समाधान पाटील यांनी केली असता त्यांची ड्युटी बंद केली त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करा असे सांगून हजरच केले नाही त्यांची पत्नी व मुलांनीदेखील मॅनेजर शंकर पाटील, ठोकळ , कदम यांना विनंती केली मात्र कुणीही त्यांच्या त्रासाची दखल घेतली नाही दुसरे कुठलेही काम मिळाले नाही त्यांचे दोन हर्नियाचे ऑपरेशन झाले कर्जबाजारी झाले शेवटी त्यांनी आत्महत्या केली सर्व सुरक्षारक्षकांमार्फत लेखी तक्रारदेखील करण्यात आली की दिलीप पाटील आम्हाला सुरक्षा सुपरवायझर पदावर नको पण काही बड्या व्यक्तींचा वरदहस्तामुळे ते टळले. बी व्ही पवार यांनी त्याला काढून टाकण्याचे आदेशदेखील दिले त्याने त्यांच्यावरपण दबाव आणला त्याने पवार यांना आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती .
इगल हंटर कंपनीचा ठेका 38 महिने होता कंपनीचे सर्व अधिकार दिलीप आसाराम पाटील यांच्याकडे होते 38 महिन्यात दरमहा पगार पत्रकात 50 हजारचा फरक आहे पीएफ मध्ये वीस लाख रुपये गहाळ आहेत साधारण पन्नास लाख रुपये गहाळ झालेले आहेत एवढ्या त्रुटी असताना देखील सामान्य प्रशासन विभागाने बिल ओके करून कसे काय पुढे पाठवले हा प्रश्नच आहे वराडे , वळवी , विद्या पाटील यांची भूमिकापण संशयास्पद आहे. सिंग वीस वर्षापासून विद्यापीठात ठेका चालवतात त्याचा पारदर्शक कारभार आहे तरीदेखील दिलीप पाटील खोट्या अफवा पसरून सिंग यांचा ठेका रद्द करण्याच्या मागे लागला आहे इगल हंटर कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये असतानादेखील विद्यापीठांने तिला सुरक्षारक्षकाचा ठेका दिला आहे