जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी दि. ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.
विद्यापीठातर्फे ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ आणि एप्रिल/मे-२०२२ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता ऑनलाईन पदवी / पदविका प्रमाणपत्र अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner-> Examination-> Convocation वर उपलब्ध आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत आहे. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि.१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ३५०/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १०००/- भरावे लागतील. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ.दीपक दलाल यांनी केले आहे.