भुसावळ (प्रतिनिधी) :- भंडारा येथील एम डी एम फ्युचर स्कुल लाखनी येथे आयोजित केलेल्या ’सी बी एस ई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ २०२३-२४ स्पर्धेत भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी ज्ञानेश कुंदन नाफडे ह्याने ६० किलो वजन गटात रौप्य पदक मिळवून हरियाणा येथे होणार्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये आपले स्थान निश्चित केले.
त्याने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.