पूर्वा चौधरीचे तिहेरी सुवर्ण, काजल सोनवणेचे सुवर्ण-रौप्य यश
जळगाव (प्रतिनिधी):- महाविद्यालयांच्या विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू क्रीडा स्पर्धा एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर व जळगाव विभागातील संलग्न महाविद्यालयांच्या विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू क्रीडा स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले. तृतीय वर्ष एआयअँन्डडीएस अभियांत्रिकी शाखेतील पूर्वा नारायण चौधरी हिने तायक्वांदो (५३ किलो) गटात प्रथम त्याचबरोबर वुशू (५५ किलो) व कराटे (५२ किलो) या दोन्ही प्रकारांतही सुवर्णपदक मिळवत तिने तिहेरी विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. तिच्या वेग, तंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे परीक्षक व प्रेक्षकांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले.तसेच तृतीय वर्ष एआयअँन्डडीएस शाखेतील काजल कैलास सोनवणे हिनेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कराटे (४५ किलो) प्रकारात प्रथम तर वुशू (४३ किलो) प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयासाठी दुहेरी यश संपादन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण सराव व जिद्दीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे क्रीडा विभागाने नमूद केले.या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या दणदणीत यशाबद्दल गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करून पुढील आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाविद्यालयात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली भक्कम ओळख निर्माण केल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत यश मिळवल्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी देखिल कौतुक केले.