मनोविकार तज्ज्ञ डॉ. धरव शहा यांचे आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव ( प्रतिनिधी ) – बेंगलोर येथील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. धरव शहा यांचे आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केतकी सभागृहामध्ये शुक्रवारी दि. १२ रोजी दुपारी अडीच वाजेला मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

दारू व तंबाखूमुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर निम्हान्स इन्स्टिट्यूट, बेंगलोर येथील डॉ. धरव शाह हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महाविद्यालयातील मानसोपचार विभागाचे डॉ. मयूर मुठे, डॉ. उमेद महाडिक, डॉ. हिमेश जाधव, डॉ. रुचिता आटे, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. देवांश कडत्रा यांचेदेखील मार्गदर्शन यावेळी होईल. विद्यार्थ्यांनी केतकी सभागृहामध्ये वेळेवर दुपारी अडीच वाजता उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.









