साकेगाव जवळ उड्डाणपुलावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगावाच्या पुढे उड्डाणपुलावर एका मालवाहू रिक्षाला अचानक आग लागल्याने ती आगीत खाक झाली. यामुळे रिक्षाचालकाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात येत आहे.
सारंग रामदास माळी यांच्या मालकीचे एमएच १९ सी डब्ल्यू २०७० हे मालवाहू वाहन बायोमेडिकल वेस्टच्या कामाला वापरले जात आहे. हे वाहन भुसावळ येथून दि. २२ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगाव कडे जात होते.(केसीएन) साकेगाव ओलांडल्यावर नदीच्या पुलावर अचानक रिक्षाला आग लागली. चालक सारंग माळी यांची तत्काळ रिक्षा बाजूला लावून बाहेर निघाले. तोवर रिक्षाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला. माहिती मिळताच नशिराबाद व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. एका अग्निशमन दलाच्या बंबाच्या मदतीने हि आग आटोक्यात आणून रिक्षाची आग विझवण्यात आली.