शिरसोलीजवळ आढळला मृतदेह
ओळख पटविण्याचे तालुका पोलिसांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेरुळावर एका अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी उघडकीस आली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या अनोळखी तरुणाजवळ हजरत निजामुद्दीन ते कल्याण जंक्शनचे जनरलचे तिकीट सापडले आहे. रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी जळगाव ते शिरसोली रेल्वे लाईन खांबा क्रमांक ४१३- २ ते ४ दरम्यान हा ३५ ते ४० वर्षांचा अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
तो रेल्वेतून पडून मयत झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर तरुणाची ओळख पटवावी असे आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोहेका अनिल फेगडे यांनी केले आहे.