मतदारसंघात पालकमंत्र्यांचे वर्चस्व
धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगावातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाच्या पॅनलला १२ जागा, महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव मतदारसंघ आहे. त्यांनी मतदारसंघातील बाजार समिती राखली आहे.
विजयी उमेदवारांमध्ये सर्व साधारण मतदार संघात सुरेश चौधरी, सुनील पवार, सुदाम पाटील, जिजाबराव पाटील, रघुनाथ पाटील, किरण पाटील, रंगराव पाटील, महिला राखीव मतदार संघात लता पाटील, रेखा पाटील, ओबीसी मतदार संघ रमेश पाटील, विजाभज विमाप्र मतदार संघात दिलीप धनगर, अनुसूचित जाती व जमाती मतदार संघात संजय पवार, ग्रामपंचायत सर्व साधारण मतदार संघात सुरेखा चौधरी, रवींद्र पाटील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघात प्रेमराज पाटील, व्यापारी मतदार संघात नितीन करवा, संजय काबरे, हमाल मापाडी मतदार संघात ज्ञानेश्वर माळी हे विजयी झाले. दोन्ही पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली.