रावेर तालुक्यातील अभोडा धरणातील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील अभोडा धरणाच्या पाण्यात पडून बुडाल्यामुळे तालुक्यातील विश्राम जिन्सी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील विश्रामजिन्सी येथील रंगलाल मांगीलाल जाधव (वय ३५) हा ११ ऑक्टोबर रोजी कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी सात वाजेपूर्वी अभोडा धरणाच्या पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मांगीलाल चना जाधव यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ईश्वर जाधव करीत आहेत.