हिवरा आश्रम (वृत्तसंस्था ) ;- पेनटाकळी प्रकल्पाचा कालव्यामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. कालव्यातून पाणी पाझरत असल्यामुळे त्यांच्या जमिनी वहिती होत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी करून ही संबधीत विभागाने त्याची दखल घेतली नाही़ त्यामुळे, संतप्त झालेल्या आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांसह आंदाेलन सुरू केले़. या आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली़. त्यामुळे, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली हाेती़. तरफ्यावर असलेल्या लाेकांनी आमदारांना वाचवले़.एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी आपले आंदाेलन मागे घेतले़