जळगाव ( प्रतिनिधी ) – काहीही कारण नसतांना एकाने शहरातील गेंदालाल मिल येथे एकाला धारदार वस्तूने हाताला मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार ७ सप्टेंबर रोजी रात्री एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक रामचंद्र कोळी (वय-४५) रा. घाडवेल ता. चोपडा ह.मु. के.सी.पार्क, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल येथे कामाच्या निमित्ताने आले होते. दरम्यान, रिक्षा स्टॉपजवळ दिपक प्रकाश भोसले रा. गेंदालाल मिल, जळगाव याने काहीही कारण नसतांना अशोक कोळी यांना धारदार वस्तूने हातावर वार करून जखमी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिपक भोसले याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहे.