एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :– तालुक्यातील रायपूर येथे राहणाऱ्या एकाने मोटारसायकल हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने दोघांनी चॉपर आणि चाकूने हल्ला करून दोन भावंडांना जखमी केल्याची घटना २८ रोजी च्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दोन आरोपीना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी कि , मिथुन फकीरा परदेशी वय 25 वर्ष तरुण रायपूर येथे राहत असून तो चटई कामगार आहे. २८ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मिथुन याच्या गावातील दुर्गेश कैलास परदेशी व श्रीकांत मोहन धनगर यांनी मोटारसायकलवर घरासमोरून दोन तीन वेळा चकरा मारल्या . मात्र मिथुन याचा भाऊ विशाल याने कशाला चकरा मारता आहे कोणाला धक्का लागला तर असे बोलताच त्यांनी मोटार सायकल उभी करुन तुम्हाला जास्त झाले आहे अशी धमकी देऊन शिवीगाळ केली . तसेच मिथुन याने हळु चालविणे बाबत सांगत असतांना तुम्ही शिवीगाळ कशी करता असे बोलताच श्रीकांत मोहन धनगर याने त्याचे कमरेतून चॉपर काढुन मिथुनच्या पाठीला मध्यभागी तसेच उजवे हाताच्या कमरेवर मारून जखमी केले. तसेच आरोपी दुर्गेश कैलास परदेशी याने त्याच्या हातातील चाकुने भाऊ विशाल परदेशी यांच्या पाठीवर डाव्या बाजुस मारुन जबर दुखापत केली. यावेळी श्रीकांत धनगर व दुर्गेश परदेशी आमच्या नांदी लागले तर जिवंत सोडणार नाही याद राखा अशी धमकी देवुन पळुन गेले. दोन्ही भावांवर उपचार सुरु असून मिथुन याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने एमआयडीसीच्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण ,गफूर तडवी ,राहुल रगडे विशाल कोळी, संदीप धनगर, यांनी तातडीने दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन कारवाई केली.