धरणगाव ;- जळगावातील कोव्हीड रुग्णालयात धरणगावातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर जळगावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
धरणगावात आधी कोरोनाचा संसर्ग नव्हता. तथापि, अलीकडच्या काळात शहरातील रूग्णांची संख्या झपाट्याने वाढून दहावर गेली. यात आधी एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास दुसर्या पॉझिटीव्ह महिलेचा कोविड रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. ही महिला खत्री गल्ली परिसरातील रहिवासी होती. यामुळे आता शहरातील कोरोनाग्रस्तांच्या बळीचा आकडा दोनवर गेला आहे. शहरात एकूण दहा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून यातील सहा रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. यामुळे आता शहरात दोन कोरोना पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.