गावपुढाऱ्यांकडून नियोजन सुरु
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवारी श्रेयस दीपक शिरसाठ या मुलाच्या हस्ते काढण्यात आले. ३९ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतसाठी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, अव्वल कारकून गणेश पवार यांनी सहकार्य केले.
आरक्षणामध्ये अनुसूचित जाती महिला : अनोरे, बोरखेडा, पथराड बुद्रुक, जनरल : डॉ. हेडगेवार नगर, हिंगोणे बुद्रुक.
अनुसूचित जमाती महिला : पाळधी बुद्रुक, धानोरा, खामखेडा, हनुमतखेडा, भामर्डी, वाकटुकी, जनरल : चोरगाव, निमखेडा, सतखेडा, फुलपाट, निंभोरा, दहिदुले या गावांचा समावेश आहे.
इतर मागास प्रवर्ग आरक्षण महिला : अहिरे बुद्रुक अहिरे खुर्द, गंगापुरी बुद्रुक, बांभोरी प्रचार, आव्हाणी, भोद बुद्रूक, हिंगोणे खुर्द, वराड बुद्रूक, साकरे. पष्टाने बुद्रुक, लाडली, टाकळी खुर्द, मुसळी बुद्रूक, मुसळी बुद्रूक, जनरल : पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, नांदेड, कंडारी बुद्रुक.
सर्वसाधारण महिला- एकलग्न, बाभुळगाव, चमगाव, उखळवाडी, तरडे खुर्द, अंजनविहिरे, सोनवद बुद्रुक, धार, पाळधी खुर्द, दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, झुरखेडा, भोद खुर्द, पिंपळेसिम, वाघळूद खुर्द, भवरखेडा, विवरे, जांभोरा, सार्वे खुर्द, बिलखेडा, बांभोरी बुद्रुक, कवठळ, चावलखेडे.
सर्वसाधारण गट आरक्षण : नारणे, खर्दै बुद्रुक, सोनवद खुर्द, चांदसर बुद्रूक, शेरी, रेल, पथराड खुर्द, एकलग्न बुद्रुक, पोखरी, वराड खुर्द, वंजारी बुद्रुक/खपाट, चिंचपूरा, पिंप्री खुर्द, भोद खुर्द, कल्याणे खुर्द, कल्याणे होळ / कल्याणे बुद्रूक, वाघळूद बुद्रुक, बोरगाव बुद्रूक, बोरगाव खुर्द, खर्दे बुद्रूक,, पोखरी, साळवा.