जळगाव ( प्रतिनिधी ) – पी.आर.हायस्कूल सोसायटीचे, कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी पीएमउषा अंतर्गत व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण,आंतरशाखीय संशोधन व सामाजिक समन्वय या विषयावर सखोल चिंतन व संवाद घडवून आणणे हे होते.
परिषदेचे उद्घाटन नामवंत तज्ञ डॉ. एस. एस. राजपूत यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस . आर. कोल्हे, डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. अरुण कुलकर्णी हे होते. प्रथम सत्रांमध्ये डॉ. एस.आर. कोल्हे यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. एस आर चौधरी मूक कोर्सेस वर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. आर आर अहिरे यांनी नवऊर्जा या विषयावर व्याख्यान दिले तर डॉ. राहुल राठोड ग्रीन इंटरप्रेनरशिप या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी राज्यभरातील दोनशेच्या वर प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले व शोधनिबंध सादरीकरण करून, चर्चासत्रे व संवादात्मक सत्रांमधून सहभागींच्या विचारांची देवाण-घेवाण केली आहे.धरणगाव महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ही परिषद राज्यातील संशोधक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणणारा दुवा ठरुन महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरेल व भविष्यामध्ये संशोधनामध्ये नवीन दिशा निर्माण होईलअसे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या चर्चासत्रासाठी संस्थेचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, वसंतराव गालापुरे, संचालक अजय शेटजी पगारिया, सौ नीनाताई पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी बहुसंख्येने विद्यार्थी, संशोधक, अभ्यासकांनी परिषदेला उपस्थित राहून या शैक्षणिक उपक्रमाला यशस्वी केले याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजयानंद वारडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. संदीप पालखे, विविध समितीचे प्रमुख व सदस्य, तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे , राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.