धरणगाव (प्रतिनिधी) :- प. रा. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे आय. क्यू. ए. सी., विद्यार्थी विकास विभाग, एन.एस.एस. आणि इंद्रधनुष्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “वंदन महामानवाला” भीम गीतांची स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन दि. ६ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर हॉल येथे करण्यात आले.
कार्यक्रमात प्रणिता सोनवणे, विशाल सोनवणे, प्रवीण शिंदे या विद्यार्थ्यांनी भीम गीतांचे सादरीकरण करत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे आणि जीवन कार्याचे दर्शन स्वरांच्या माध्यमातून श्रोत्यांना घडविले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा.डॉ.पी.एस.बोरसे यांनी बाबासाहेबांचे कार्य विशद करतांना हिंदू कोड बिल या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संजय शिंगणे हे यांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र या विषयावरील अभ्यासाचे उदाहरणासहित उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी एनएसएस समन्वयक डॉ. ए.ए.जोशी, डॉ.व्हि.ए.वारडे, कार्यालयीन अधीक्षक रितेश साळुंखे हे व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.स्वप्निल म.खरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.एच.ए.भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,डॉ.गौरव महाजन, डॉ. ज्योती महाजन, डॉ. दीपक बोंडे, डॉ.गायकवाड, डॉ.केदार प्रा.योगेश पाटील,महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी श्रोत्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेत महामानवाला आदरांजली अर्पित केली.