जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानवड येथे आज दि. 21 ऑगस्ट रोजी धानवड ग्रामपंचायत व phc सेंटर नशिराबाद यांचे संयुक्त विद्यमानाने लसीकरण घेण्यात आले यावेळी गर्भवती महिला,अपंग,व 2 रा डोस व 18 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. धानवड येथे लसीकरण शिबीर घेण्यात यावी यासाठी गावातील जेष्ठ नागरीक व महिला आग्रही होत्या व त्यासाठी मा, पालंक मंत्री गुलाबराव जी पाटील व युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी पाठपुरावा करुन 280 लसींचे डोस मिळवले होते.


लसीकरण यशस्वीतेसाठी डॉ. चेतन अग्निहोत्री, डॉ. अक्षय पाटील, आरोग्य सेवक रवींद्र पवार, आरोग्यसेविका योगिता कोकाटे, मदतनीस संगीता पाटील
आशा अनिता पाटील, विजया हरणकर, रेखा बोदडे नेत्रा पाटील तसेच धानवड ग्राम पंचायत कर्मचारी महेश ( बंडु ) पाटील, गजानन वाघ,श्रीराम सातपुते ह्यांनी सहकार्य लाभले.
तसेच सरपंच संभाजी पवार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, ग्रा.पं सदस्य हरीलाल शिंदे, हेमंत दादा चव्हाण, दिलीप पाटील,व युवासेनेचे ता.सरचिटणीस अविनाश पाटील हे लसीकरण स्थळी दिवसभर थांबुन लक्ष ठेवुन होते व ह्या सर्वांचे सुद्धा विशेष सहकार्य या ठीकाणी लाभले.







