धानोरा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील धानोरा येथे बसस्थानकवरचे इंडीकँश बँकेचे एटीएम काल मध्यरात्री चोरांनी उचलुन नेल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. ही चोरी सकाळी उघडकीस आल्यावर पोलिस पाटील दिनेश पाटील यांना शेजारील लोकांनी फोनद्वारे माहीती दिली.
घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे स पो नि किरण दांडगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, कादिर शेख आदींनी पाहणी केली. रस्त्याच्या पुढे असलेले सदगुरु स्विट्स आणि नमकीनवर असलेले सिसिटिव्ही फुटेज पोलिसांनी तपासले त्यात उत्तररात्री २ वाजुन २३ मिनिटांनी एक मोठा ट्राला जळगावकडे तोंड करुन उभा दिसत आहे.यावेळी समोरच्या महाजन शाळेचे व गावातील कॅमेरेही बंद होते या एटीएममध्ये अंदाजित दिड लाखापर्यंत रक्कम होती अशी चर्चा घटनास्थळी होती.
गेल्या दोन वर्षात इंडीकँशचे एटिएम तीन वेळा फोडण्यात आले संबंधित अधिकारी यांनी पोलिसात तक्रार देत नाहीत अशीही माहीती समोर येत आहे.