अमळनेर तालुक्यात धानोरा फाट्याजवळ घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मारवड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २९ रोजी रात्री घडली आहे. ट्रक चालकाविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल क्ररण्यात आला आहे.
कळमसरे येथील रहिवासी संतोष ओंकार माळी (वय ४८) हे २९ रोजी रात्री ८ वाजता अमळनेर येथून दुचाकीने परतत होते. धानोरा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच १४ एचयू ८४११) वरील चालकाने भरधाव वेगाने चालवून धडक दिल्याने संतोष माळी हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना धुळे येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. ट्रक चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ प्रवीण पारधी हे करीत आहेत.