जळगाव ( प्रतिनिधी ) – ढाकेवाडीत ज्वेलर्सचे दुकान फोडून ५ लाख रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे आज उघडकीला आले चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत .
प्रसन्न प्रदीप सराफ (रा. ढाकेवाडी ) हे कुटुंबियांसह तीनमजली इमारतीत राहतात. त्यांचे घराच्या बाहेर नंदूरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. शनिवारी प्रसन्न यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकान फोडले. दुकानातील ५ लाख रूपये किंमतीचे दागिने गोणीत भरून नेले हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी ३.३२ वाजता चोरट्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. दोन जणांनी आत प्रवेश केला. एक जण बाहेर थांबला होता. तिघांनी डोक्यावर टोपी, हातमोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. ३.४८ वाजता दुकानात गेलेले दोन चोरट्यांनी गोणीत दागिने भरून नेले .
प्रसन्न सराफ यांची आई आज सकाळी बाहेर आल्या तेव्हा त्यांना दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जावून पाहिले दुकानात चोरी केल्याचे उघडकीला आले. एमआयडीसी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले स पो अधिक्षक कुमार चिंथा, पो नि प्रताप शिकारे यांनी पाहणी केली.