जळगाव शनिपेठ परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील काट्याफैल-गवळीवाड्यात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक होवुन दंगल उसळली. पानटपरीवर झालेल्या वादातून दोन गट समोरासमोर येवुन तुफान दगडफेक झाली
याबाबत सविस्तर असे काट्या-फैल शनीपेठ भागात रात्री साडेनऊच्या सुमारास पानटपरीवर उभ्या तरुणांमध्ये किरकोळ वाद होवुन हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीचे रुपांतर दगडफेकीत होवुन दोन गट समोर समोर उभे ठाकले. गृहरक्षक दलाचा जवान विलास देसले याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही दोन्ही गटा कडून मारहाण करण्यात आली असल्याचे कळते. तर, आकाश जोशी याची दुचाकी(एमएच.१९.बी.जी.५२१४)व फोरव्हिलर याची दंगलखोरांनी तोडफोड करुन नुकसान केले.दोन्ही बाजुने झालेली दगडफेकीत एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने तत्काळ, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, यांच्यासह राखीव पोलिसबळ घटनास्थळी दाखल झाले होते. भिलपुरा पोलिस चौकी ते ममुराबाद रोड या रस्त्याचे काम सुरु असून दोन्ही बाजुने गिट्टी खडी आणि दगडं पडलेली आहेत. एका बाजुला गवळीवाडा-दुस-या बाजुला काट्याफैल अशा स्वरुपात जमावाने एकमेकांवर रस्त्यांची गिट्टी आणि दगडांचा मारा केला याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे घटनास्थळी शातमय वातावरण आहे. पुढील तपास व माहिती पोलीस घेत आहे.