धुळे जिल्ह्यातील चितोड येथील घटना ; सहा जण जखमी
धुळे ;- देशभरात सर्वत्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठई सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असतांना मात्र धुळ्या जवळ असणाऱ्या चितोड गावात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटण्याने झालेल्या अपघातात दोन मुले आणि एक लहानगी मुलगी ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी सुरू असताना ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जखमींना त्वरीत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्यातील तिघांना मृत घोषीत करण्यात आले. विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु असताना अचानक ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीत शिरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. काही मुलांना हे समजण्या आत ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. या अपघातात परी बागूल 13 वर्षे, शेरा सोनवणे 6 वर्ष आणि लड्डू पावरा 3 वर्षे, या मुलांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. मृत आणि जखमी सर्व चितोड येथील रहिवासी आहेत.