जळगाव ( प्रतिनिधी ) – गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवराम नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून दागीने आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली भिकन मराठे (वय-५२, रा. देवराम नगर, गुजराल पेट्रोल पंप परिसर ) ह्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. १० डिसेंबररोजी रात्री त्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून लोखंडी कापाटातील दागिने व रोकड असा एकुण १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार ११ डिसेंबररोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. या महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.