जळगाव(प्रतिनिधी )- येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची या गुरुवारी डबल सेंचुरी पार केली. आठव्या गुरुवारी देखील 25 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करून 200 चा आकडा पार केला. रुग्णालयातर्फे सवलतीच्या दरात या शस्त्रक्रिया केल्या जात असून, अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू, तर अवघ्या 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. गावागावात या अभियानाची माहिती झाली असून शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी करून घेण्यासाठी रुग्णांचा प्रचंड ओघ रुग्णालयात दररोज सुरू आहे. येथे अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांनी आपली आर्थिक बचत करण्यासाठी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनाने केले आहे. मो. 9370935252 यावर संपर्क साधण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.