जळगाव ;– म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट म्हणून ऑक्सिजन किटची भेट देण्यात आली. हे ऑक्सिजन किट माजी आमदार गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, बबलू पाटील यांनी दिले. या वेळी फेडरेशनचे सभापती लीलाधर तायडे, संचालक रोहिदास पाटील, पुरुषोत्तम चौधरी, वाल्मीक पाटील, अशोक लाडवंजारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय चव्हाण, डाॅ. प्रशांत गर्ग, डाॅ. नीलेश अग्रवाल, आराेग्य सेवक नीलेश चाैधरी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. नितीन पाटील आदी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिरात १३५ दात्यांनी रक्तदान केले.








