जिल्हा बँकेतील पहिला दिवस
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज पहिल्या दिवशी बँकेत महापुरुष व दिग्गजांना अभिवादन करून आपापल्या कामकाजास सुरुवात केली.
आज सकाळी 11 वाजता श्री देवकर यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला व सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर बँकेच्या संस्थापक दादासाहेब डी. जी. जुवेकर, सहकार महर्षी, आप्पासाहेब जे एस पाटील, बी. डी. देशमुख या सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आपल्या पहिल्या दिवसाच्या कामकाजास सुरुवात केली.
त्यानंतर श्री देवकर यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून बँकेचे सद्यस्थिती जाणून घेतली. कामकाजाचा पहिला दिवस असल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे शरद महाजन यांच्यासह सहकार व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराचा हा कार्यक्रम दिवसभर सुरूच होता.