अंतिम वर्षाच्या 85 विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पंधरा दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले. शिबिरात एकूण 85 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पंधरवड्यातील प्रशिक्षण शिबिरात दरम्यान विविध विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. पुणे येथील नामांकित जेटीटी फाउंडेशनचे प्रमुख समन्वयक रोहित काळे, प्रियांका माळी, रेश्मा कुंभार यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षक म्हणून अजय बेंद्रे व मिर्झा अर्षद बेग यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिबिरात विद्यार्थ्यांना कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, वैद्यकीय ज्ञान व निर्णय समर्थन प्रणाली, आरोग्य विमा व्यवस्थापन, रुग्ण केंद्रित माहिती प्रणाली, फार्मा को व्हिजलिन्सचा परिचय, केमिकल चाचणी माहिती, मेडिकल बिलिंग, वैद्यकीय प्रतिलेखन, वैद्यकीय परिचय, फार्मा कोअर क्षेत्राचा परिचय यासह मुलाखत कौशल्य, सॉफ्ट स्किल, व्यवसाय शिष्टाचार आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी सलग पंधरा दिवस प्रशिक्षण घेतले. देवकर फार्मसीमध्ये वर्षभर असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, प्रशिक्षण शिबिर हा देखील या उपक्रमाचा एक भाग होता. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण सुरळीत पार पडल्याबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विशाल देवकर, प्राचार्य योगेश पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.