धरणगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन झाले, जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी व आयुष रुग्णालयातर्फे झालेल्या या शिबिरात ५८३ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तपासणी झालेल्या रुग्णांवर देवकर रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असून, योजनेत बसत नसलेल्या आजारांवर सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.
येथील पी आर विद्यालयात झालेल्या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते झाले. श्री देवकर यांनी पालकमंत्री असताना जळगाव ग्रामीण मतदार संघाचा कायापालट केला होता, त्याचप्रमाणे आता धरणगाव तालुक्याच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर श्री देवकर यांनी जबाबदारी स्वीकारून तालुक्यातील रुग्णांसाठी धरणगाव येथून देवकर रुग्णालयातर्फे मोफत बस सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, तसेच सर्व रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी पी. आर विद्यालयाचे अध्यक्ष डॉ अरुण कुलकर्णी, सचिव डॉ मिलिंद डहाळे, जि प सदस्य रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, अरविंद देवरे, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष मोहन पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, नाटेश्वर पवार, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, विलास पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, रंगराव पाटील, गोपाल बाविस्कर, संभाजी कंखरे, सुरेश महाजन, वसंतराव पाटील, नारायण चौधरी, अमोल हरपे, सागर वाजपेयी, अजय महाजन, धीरज धनगर, नाना पाटील, उज्वल पाटील, गुलाब पवार, दिलीप धनगर, बाळू पाटील, किशोर भदाणे, दिनेश भदाने, अमित शिंदे, अफरोज पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.