जळगाव (प्रतिनिधी ) ;- आज दिनांक 26 शनिवार रोजी गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी वैद्यकीय व आयुष रूग्णालयाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन जळगाव तालुक्यातील सुभाषवाङी या गावात करण्यात आले होते शिबिरास जवळपास 541हुन अधिक लोकांनी आपली आरोग्य तपासणी केली.माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सुभाषवाङी गावाचे उपसरपंच परशुराम राठोड, माजी सरपंच रामदास चव्हाण, ग्रा मपंचायत सदस्य पंङीत टेलर, माजी सरपंच श्रावण राठोड ,सरपंच रामलाल भिगा चव्हाण, विका,चेअरमन रोहिदास राठोड, लोणवाङी सरपंच बापु पाटील, वङली माजी सरपंच संभाजी पाटील ,बोरनार माजी पिंटु चौधरी, बोरनार गावातील उपसरपंच आरुण कोळी, वराङचे माधव जाधव ,वसंतवाङी गावातील माजी सरपंच भिका चव्हाण, ग्रा मपंचायत सदस्य भास्कर सोनार, वावडदा सरपंच राजेश वाङेकर, ङाॅकटर सेल जिल्हाध्यक्ष नितिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव तालुका अध्यक्ष बापु परदेशी ,अल्प संख्यांक सेल तालुका अध्यक्ष बाबु पिजारी, परिसरातील सवॅ कार्यकर्त्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.