माजी मंत्री गिरीश महाजन विशेष विमानाने मुंबईकडे रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन हे जळगावहून आज दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० दरम्यान विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लॉकडाऊनच्या काळात ते सातत्यानं राज्यात दौरे करत होते. पक्षानं बिहार निवडणुकीची जबाबदारी टाकल्यानंतर ते बिहारलाही जाऊन आले होते. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे व सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यांतून त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यातूनच त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.







